Wednesday, April 8, 2009

माणुसकी

कालच एक इंसिडेंट ऐकला . माझ्याच एक colleague च्या भावाचा एक्सीडेंट जाला. अगदी किरकोळ.
तिचा भाऊ around १८ yrs old. एक साधारण ४०-४५ वयाच्या माणूस या एक्सीडेंट मध्ये पडला.
त्याला पण फरसे लागले नही, इतपत की तो स्वतः नीट चालू, फिरू आणि गाड़ी देखील चालवू शकत होता.
हा इंसिडेंट सारसबाग च्या सिग्नल जव्वळचा . त्याचे काम करण्याचे ठिकाण तिथेच जव . एका जवळच्याच हॉस्पिटल मध्ये तय माणसाने या मुलाला यायला सांगितले, just to check whether he got any injuries or so.
या colleague च्या घरच्यांची धावपळ. त्या मुलाची आई त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचली. तिथल्या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की काहीही जालऐ नही. तेव्हा हा गृहस्थ, मंगेशकर हॉस्पिटल मध्ये गेला.
तिथे after 40 check up, full body X-ray, CT scan असे सगळे केले. एवढे करून राहवले नही, म्हणून एक दात या एक्सीडेंट मध्ये पडला तर तो replace करणार आहे. आणि ही सगळी treatment A.C. रूम मध्ये.
याचा सगला खर्च करायचा त्या मुलाच्या घरच्यानी आणि हे करून ही तो पोलिस कंप्लेंट करणार नाहीये अशी खात्री देत नाहीये.

म्हणजे, आम्ही ज्यानी हे सगळे ऐकले, ते कुणीही आता इथून पुढे accident झाला तरी माणुसकी दाखावण्याच्या फंदात पडणार नाही.
एखाद्या माणसाने इतका फायदा घ्यावा ?

आणि पोलिस कंप्लेंट का नाही करून द्यायची, कारण ती केस उभी राहणार, unnecessary अनेक वर्ष चालणार, हातात तर काही पडणार नही, एवढे करून नाव ख़राब होणार ते होणार .. आणि हा सगळा मनस्ताप काहीही चूक नसताना.

परत जर ती केस बंद करायची इच्छा असेल तर, सगळ्याना पैसे चारत फिरायचे.. पुन्हा मनःस्ताप..

म्हणजे आपल्याकडे खरेच विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट राहिली नाही का ? सगळीकडे भ्रष्टाचार ....

सगळे म्हणतात, नुसते चुका दाखावण्यात अर्थ नही, तर स्वतः काहीतरी पाउल टाकले पाहिजे.. पण असे पाउल पुढे टाकुन जर दरीतच जाणार असेल तर कोण त्यासाठी धजावेल?

1 comment:

Unknown said...

hmmm...agdi khare aahe he..