आज माझ्या एका collegue ने स्वीट्स वाटले कारण त्याच्या वाहिनीला मुलगी झाली आणि घरातले सगळे मुलगी झाली म्हणुन जास्त खुश असेही त्याने सांगितले.
हे ऐकल्यानंतर एका मुलीने कमेन्ट केली की समाज सुधारतो आहे, भारतात कुठे तरी मुलीच्या जन्माचा आनंद साजरा होतो आहे. मग पुढे असे मत पडले की, ग्रामीण भागात आज ही हुंडा द्यावा लागत असल्याने कदाचित तिथे हा आनंद होत नाही. मला अर्थात हे पटले नाही. हे ही एक कारण असेल , पण आणखी एक कारण म्हणजे आज ही आपल्या समाजात मुली लग्न झाल्यानंतर आई वडीलांना आर्थिक मदत करत नाहीत, उघडपणे करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या म्हातारापणात मुलेच त्याना आधार देऊ शकतात ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की रुजली आहे. यालाच मग वंशाचा दिवा आणि त्या सदृश अनेक नावे दिली गेली आणि पुत्र जन्माचे सोहळे साजरे होऊ लागले.
का आज पण आपला समाज या अशा पद्धती पाळतो ? हुंडा , वंशाचा दिवा ? का आज ही लोकाना मुलेच हवीच असतात ? म्हणजे ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून सांभाळले, मोठे केले , तुम्हाला शिकवले, त्यासाठी पैसे खर्च केले. त्यांच्या साठी मुलीनी मानसिक आधाराशिवाय दुसरे काहीच करू नये ?
माझ्या मते ज्यां आई वडीलाना सांभाळायला भाऊ आर्थिक दृष्टया सक्षम नाहीये, त्या घरी आज सुद्धा मुलींनी मदत केली तर कुणाचा विरोध असू नये आणि त्यांना ती मदत करायला प्रोत्साहन मिळायला हवे.
पण तरीही एक नमूद करायला हवे, आजच्या पिढीत थोड़ा तरी बदल दिसत आहे. हा कदाचित शिक्षणाचा परिणाम असेल आणि आज पालक आर्थिक बाबतीत जास्त सक्षम आहेत तेव्हा त्यांना स्वतःच्या म्हातारापणाची
तेवढी काळजी नाहीये, जिथे त्याना वंशाच्या दिव्याची गरज भासेल :-) .
हा आशेचा किरण उद्या मोठा प्रकाशाचा झोत व्हावा हीच प्रार्थना !
Monday, April 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
chan aahe..lihit raha ...aamhi vachat rahu
Post a Comment