Thursday, April 9, 2009

अज्ञात तरीही प्रभावी

आजचे युग कलियुग! म्हणजे सो कॉल्ड माडर्न. इथे सकाळी उठल्यापासून आपण अनेक आधुनिक गोष्टी जगत असतो,
वापरत असतो. अंधश्रद्धेला या युगात थारा नही, हे सगळे जण मान्य करतील. तरीही प्रत्येकाचा आपापल्या परीने कोण्या एक अज्ञात शक्ती वर दृढ़ विश्वास आणि कदाचित म्हणुनच आज ही आपल्याकडे खूप वाईट घटना (आत्महत्या, नैराश्य) ऐकिवात नही. थोड्या फार(?) अधून मधून वृत्तपत्रात येत असतात, पण तरीही आपल्याकडच्या लोकसंख्येच्या मानाने कमीच किंवा, काय सांगावे सगळयांना प्रसिद्धी मिळत नसेल. असो.

तर असे आपण सगळे आधुनिक जगातले. म्हणजे मी माझ्या पिढीला संबोधून हे म्हणत आहे. एवढे असुनसुद्धा आजही आपण छोटया छोटया गोष्टिंसाठी ग्रह, तारे, दिवस, तिथी, अमावस्या आशा चक्रात अड़कलेलो.
म्हणुन मला प्रश्न आहे, खरेच का आपण आधुनिक ?? की हे फ़क्त आधुनिक असण्याचे नाटक आणि अंतर्मनात आजही आपण कुठल्याशा ग्रह तारयांवर आपले निर्णय सोडतो.

असाच एक incident झाला. म्हणुन हे सगळे प्रश्न. आता मागील आठवङयात मी स्वतः माझ्या आयुष्याची गाड़ी आणखी neat कशी चालु त्यापेक्षा धावू शकेल त्यासाठी काय करायला हवे, हे विचारण्यासठी एका ज्योतिष सदृश गृहस्थाना भेटून आले.

आणि आज मला हे जाणवत आहे, की आपल्या सगळयांची (थोड़े फार अपवाद वगळ्ता) आशा गोष्टीवर मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात थोडीशी श्रद्धा अजुन आहेच आणि ती काही आधुनिकतेनुसार जाणार नही. आजच्या सो कॉल्ड आधुनिक पिढीतल्या सगळ्याना हे नक्की पटेल की आपले आयुष्य आणखी चांगले करण्यासाठी आपण प्रयत्न करने जास्त गरजेचे आहे, बाकी सगळे उपाय नंतर. पण तरी आपण "त्या" लोकानी सांगितलेले सगळे उपाय अगदी न चुकता regularly करणार, पण जे आपल्या हातात आहे त्याकडे मात्र पाहणार नही.

याला के म्हणावे अंधश्रद्धा की श्रद्धा की दोन्हीची सरमिसळ ? एक मात्र आहे, या आशा गोष्टी आहेत आणि असे कही उपाय सांगणारे आहेत, म्हणुनच माणूस त्या आशेवर तरी आनंदाने पुढे जात आहे, कोण जाने शास्त्रिय्द्ष्ट्या म्हणुनच तो जास्त आनंदी राहत असेल आणि म्हणुन सुखी होत असेल आणि क्रेडिट मात्र ...


मी हे असा शास्त्रीय दृष्टिकोण लिहिला असला तरी, ती फ़क्त मनात आलेली शक्यता आहे, नाहीतर माझी श्रद्धा
( अंधश्रद्धा) आहेच या अज्ञात शक्तीवर.

No comments: