Wednesday, May 6, 2009

नवी वाट...नवा जोश.

नुकतेच UPSC चे रिझल्ट लागले. महाराष्ट्र मधले इतके विद्यार्थी चमकलेले कळल्यावर छान वाटले.
आणि खरेच आपला देश मुख्यत्वे मराठी लोक पुढे जात आहे असे वाटायला लागले.
म्हणजे आता ही सगळी नवीन, युवा, जोशपूर्ण पिढी प्रशासकीय, परराष्ट्र, पोलिस सेवेत रुजू झाल्यावर थोड़े फार तरी चित्र बदलेल अशी अपेक्षा ही आणि आशा ही आहे. कारण इतक्या उच्च पदावर जाण्याची आस या सगळ्या मंडळीनी फ़क्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने धरली असेल असे वाटत नाही. अर्थात हे त्यातल्या काही काहींच्या वृत्तपत्रात दिलेल्या प्रतिक्रिया किंवा भावना वाचल्यावर केलेले अनुमान.

पिढी नुसार विचार बदलतात हे पाहिले, ऐकले होते पण त्यांचा इतक्या मोठ्या स्तरावर आणि इतका चांगला उपयोग होऊ शकतो हे मात्र अचानक जाणवले.
पूर्वी खुपच कमी लोक या वाटेने जायचा विचार तरी करायचे आणि त्यातले अगदीच नगण्य सगळ्या सुविधा, अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे यशस्वी व्हायचे. जे यशस्वी होत, त्यातले अगदी थोड़े विद्यार्थी लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा ठेवायचे, परिणामी त्यांचा इतका उपयोग झाला नाही असे मला वाटते.
पण आता परिस्थिती वेगळी आहे. अगदी तळागाळातले आणि परिस्थिती नसणारे विद्यार्थी देखील खूप प्रयत्न आणि अभ्यास करून यशस्वी होत आहेत आणि म्हणुनच तेच या पदाचा आणि अधिकाराच योग्य आणि लोकहितार्थ उपयोग करतील अशी शक्यता आहे.
आणखी एक कारण हे की, साध्य असेही विद्यार्थी या यशास्वितांच्या यादीत आहेत की ज्याना दुसरी अनेक जास्त पैसे आणि आरामाचे आयुष्य देणारी कारिअर्स उपलब्ध होती, पण तरीही ही (सुरुवातीपासुनच) अवघड आणि संघर्षमय असणारी वाट निवडली , याचाच अर्थ त्यानी पैशांसाठी हे क्षेत्र नक्कीच निवडले नाहीये.
म्हणुनच या अशा लोकांकडून खूप आशा आहेच , पण इतरानी प्रेरणा ही घ्यावी ही इच्छा आणि ह्या दिशेने वाटचाल करणार्या सगळ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि यश मिळावे ही सदिच्छा आणि त्यासाठी शुभेच्छा !