Monday, April 27, 2009


कालच मी घरी गेले आणि समजले की एके ठिकाणी हळदी - कुंकुचे आमंत्रण आहे. मग तयार झाले आणि तिथे गेले.
ज्यांच्याकडे मी गेले त्यांच्या घरी सतत काही ना काही अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. अशा प्रकारचे म्हाणन्यामागचे कारण हे की ते कार्यक्रम mostly या मुहुर्तावर ही पूजा, या देवाची/ देवीची पूजा, या महिन्यातली ही पूजा, या तिथी किंवा या दिवशी ही पूजा करायची असते म्हणुन या सगळ्या पूजा.
आणि तिथे discussion चालू होते की, मोठ्या माणसांनी हे continue केले तरच पुढच्या पिढीला ते समजेल आणि त्याना तो वारसा पुढे चालावता येईल वगैरे. as usual मला ते पटले नाही. कारण आजच्या काळात जिथे नवरा बायको दोघेही जिवाची कुतरओढ़ करून नोकरी करतात त्याना हे सगळे करायला खरेच वेळ आहे ? (अर्थात जिथे मदत करायला घरात मोठी माणसे आहेत त्यानी स्वेछेने करायला हरकत नाही) त्यानी हे सगळे सांभाळावे की या इतक्या स्पर्धेच्या युगात स्वतःची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत ? हा नास्तिक विचार आहे असे नाही, rather तो जास्त practical विचार आहे, कारण उद्या जर एखाद्याची नोकरी जरी गेली तर या सगळ्या पूजा अर्चा नवीन नोकरी नाही मिळवुन देऊ शकत. असो.

तशा त्या बाई घरीच असतात, पण तरीही मला एक आश्चर्य वाटते की लोक इतक्या religiously इतक्या गोष्टी इतकी वर्षे कशी करू शकतात ? म्हणजे घरात परंपरेने दरवर्षी एखादे कार्य असते आणि म्हणुन ते नेहेमी करत राहायचे। एखाद्या गोष्टीबाबत मी समजू शकते पण वर्षभर असे काही ना काही कार्यक्रम करत रहायचे म्हणजे एक प्रकारची दमणूक च असे मला तरी वाटते. आणि ज्या कोणी बायका या सगळ्या गोष्टी करतात त्या तर धन्यच !
कुठून मिळते याना ही उर्जा आणि हा उत्साह ? आणि तीच ती गोष्ट त्याच किवा थोड्या फार फरकाने वर्षानुवर्ष करून हा सगळा प्रकार montonous नाही होत का ?
अर्थात हा प्रश्न त्यानाच विचारायला हवा, मी फ़क्त माझे विचार मांडले.

4 comments:

Vijaykumar said...

Well it is same thing as one gets energy and time to watch a good movie, listen to nice song or go for outing ;)

Tejal said...

Still there is a difference, because watching a movie,listening to music etc. can not be always same, like every time u don't watch same movie or don't go to same place for outing. So those things don't become monotonous, because they are rather can be new every time.. However, the rituals that you follow can not be done in a very different or new manner, that's why they are called rituals ..

Unknown said...

see one thing is for sure - that those who all do this so called "karmkaand" are definitely non-working persons and many times the vacuum or space available which sometimes reminds them of their past or good or bad things in their life. So to avoid that loneliness or in other words to keep oneself busy or engaged in something best possible or easiest way is all these rituals. And its like addiction and one keeps it doing and doing ..and also they wish others to be involved...

i personally feel ,we can follow simple principle for this - whatever we can do at times , doing that should be honored/encouraged seeing all dependencies. Change in work is rest to mind so definitely it heals us and also some social gatherings which is human being's another basic need.
Above this whatever "punya" (if exists) we get is additional bonus :)

Gayatri said...

Actually हे सगळे rituals काही लोक करावे लागतात म्हणूनहीं करतात तर काही 'आपण परंपरेला किती महत्त्व देतो किंवा आपण किती सुसंस्कारी आहोत' ह्याचं प्रदर्शन मांडण्यासाठीही करतात. मनापासून करणारे खूप कमी.
खरं तर हातून घडणारं कोणतंही साधं कार्य कुणाचं तरी भलं करत असेल किंवा कुणालाही त्रास देत नसेल तर ती खरी पूजा.
अन हळदी-कुंकवाचं म्हणशील तर मला असं वाटतं की पूर्वी बायकांना घराबाहेर पडायला, इतर बायंकांसोबत interact करायला खूप कमी संधी मिळत असत, म्हणून मग असे काही मार्ग, त्यांनाही तेवढाच बदल अन बाहेरच्या जगासोबत संपर्क..